मारहाण करून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

धरणगाव तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात महिलेसह एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात दि १५ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी समाधान संतोष जाधव हा अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तू माझ्याशी बोलण्या चालण्याचे संबध ठेव असे बोलला. त्यावर पिडीतेने मी तुझ्याशी कशाला बोलू व तू पण माझ्याशी बोलुन नको असे बोलली. याचा राग आल्याने समाधान याने पिडीतेचे हात आणि केस पकडून चापटाबुक्कयांनी मारहान केली. तसेच संशयित आरोपीच्या नातेवाईक महिलेने देखील अल्पवयीन मुलीचे केस पकडून चापटाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परि. पो. उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.