गच्चीवर झोपलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य ; विनयभंगाचा गुन्हा

0

जामनेर ;- ३१ वर्षीय महिलेचा मध्यरात्री झोपलेली असतांना एकाने अश्लिल कृत्य करत विनयभंग केल्याचा धक्कदायक प्रकार तालुक्यातील एका गावात उघडकीस आला असून संशयिताला पोलीसांनी अटक केली असून जामनेर पोलीस स्टेशनला विनय भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी २४ जून रोजी मध्यरात्री महिला ही कुटुंबियांसह गच्चीवर झोपलेली असतांना गावात राहणारा विजय समाधान धुरकर हा आला. महिलेजवळ येवून तिच्याशी अंगलट केले. त्यानंतर तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशय आरोपी विजय समाधान धुरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखलकरण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.