Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी पार्कीगचे नियोजन
    उत्तर महाराष्ट्र

    ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी पार्कीगचे नियोजन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत जळगाव येथे मंगळवार, 27 जून, 2023 रोजी पोलीस कवायत मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

    एरंडोल, पारोळा, अंमळनेर, धरणगाव या तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी एकलव्य क्रीडा संकुल मैदान येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. पाळधी रोडकडून येणारी वाहने खोटे नगर – शिव कॉलनी – प्रभात चौक उड्डाणपूलाखालून यु टर्न घेऊन अग्रवाल चौक एकलव्य मैदान येतील.
    यावल व चोपडा तालुक्यातून ममुराबाद रोडकडून येणारी वाहने जीएस मैदान, शिवाजी पुतळा येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने ममुराबाद रोड कडून भिलपुरा चौकी- टॉवर चौक – नेहरू पुतळा – सेशन कोर्ट चौक या मार्गाने येतील.
    मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, जामनेर, बोदवड तालुक्यातून भुसावळ रोडकडून येणारी वाहने नेरी नाका ट्रॅव्हल्स स्टॉप समोरील मैदान येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने कालिंका माता चौक – अजिंठा चौक- ईदगाह मैदान ट्रॅव्हल्स समोरील पार्कीग बाजूस तर जामनेर रोडकडून येणारी वाहने अजिंठा चौक- ईदगाह मैदान ट्रॅव्हल्स समोरील पार्कीग या मार्गाने येतील.भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी सागर पार्क येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने पाचोरा रोडकडून येणारी वाहने डी मार्ट- काव्यरत्नावली चौक- सागरपार्क या मार्गाने येतील.

    जळगाव शहर व तालुक्यातून (आव्हाने, ईदगाव, आसोदा, भादली या ठिकाणाहून ममुराबाद रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी खान्देश सेंट्रल मॉल येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने ममुराबाद रोड वरून -भीलपुरा चौक -टॉवर चौक ते नेहरू पुतळा- गोविंदा रिक्षा स्टॉप उजव्या बाजूस या मार्गाने येतील.याशिवाय एसटी वर्कशॉप मैदान व ब्रूक बँड कॉलनी, रिंगरोड येथे राखीव वाहनतळाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे यांनी दिली आहे.

     

     

    Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis Guardian Minister Gulabrao Patil Planning of parking for 'Government at your Doorstep' programme Rural Development Minister Girish Mahajan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif