धोनी मुळे चक्क ‘हा’ गेम आला ट्रेंड वर, कंपनीने मानले आभार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

‘महेंद्र सिंह धोनी’ (Mahendra Singh Dhoni) नेहमी कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्तेत असतो. आता पुन्हा धोनी चर्तेत आला आहे. आणि चर्चेत येण्याचं कारण काय तर, कँडी क्रश (Candy Crush) गेम. सध्या त्याच्या विमान प्रवासाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवासादरम्यान धोनी कँडी क्रश गेम खेळतांना दिसत आहे. त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि याचा फायदा मात्र गेम कंपनीला झाला. चक्क ३ तासांत ३० लाखांहून अधिक लोकांनी कँडी क्रश अॅप डाऊन लोड केले.

धोनी काय करतो, याची उत्सुकता सर्वांनाच होती, विमानातील स्टाफलाही ही गोष्ट पाहायची होती. धोनी आपल्या टॅबवर कँडी क्रश खेळत असल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या याचं क्षणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असता, कँडी क्रश ट्रेंड करु लागलं.

त्यानंतर चाहत्यांनी कँडी क्रश खेळण्यास पसंती दर्शवली. कँडी क्रश हा टॉप ट्रेंड बनल्यानंतर, अवघ्या 3 तासांत 3 मिलियनहून अधिक लोकांनी हा गेम डाउनलोड केल्याचा दावा कंपनीने केला आहे. कँडी क्रशनेही धोनीचे आभार मानले की, गेम ट्रेंड झाला. ‘भारतीय क्रिकेट लीजेंड महेंद्र सिंह धोनी धन्यवाद. तुमच्यामुळेच आम्ही भारतात ट्रेंड करत आहोत.’ अशी भावना कँडी क्रशने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर व्यक्त केली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.