ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

0

 

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क:

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या विक्रम गोखले यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Veteran actor Vikram Gokhale) यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ते 77 वर्षांचे आहेत. विक्रम गोखले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत.

त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात आणण्यात आले होते आणि उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांची प्रकृती पुन्हा ढासळू लागली आणि आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

विक्रम गोखले यांच्या आजाराबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. विक्रम गोखले हे बऱ्याच काळापासून अभिनय विश्वात सक्रिय आहेत. मराठी नाटकांव्यतिरिक्त चित्रपटातून तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. याशिवाय विक्रम गोखले टीव्ही शोचाही भाग राहिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.