राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल व त्रिवेदी यांचा निषेध; राजीनाम्याची मागणी…

0

 

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क:

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह्य व अपमानकारक वक्तव्य आणि तसेच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी निखिल खडसे यांच्या बद्दल केलेल्या निंदनिय विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच राज्यपालांचा व प्रवक्ते त्रिवेदी यांचा राजीनामा घेवुन मंत्री गिरीष महाजनांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार महेश पवार यांना दिले.

याबाबत यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज यावलचे तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या निवेदनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते सुंधाशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्त्व्य केल्याने संपुर्ण शिवप्रेमींची भावना दुखावल्या असुन, या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. आणि दोघांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी केली.

त्याचबरोबर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जळगाव जिल्हा दुध संघाची निवडणुक डोळया समोर ठेवुन राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांच्या एका दुदैवी खाजगी घटनेचे राजकारण केलेल्या विधानाचा ही जाहीर निषेध नोंदविला असुन, अशा प्रकारे खालच्या पातळी चे वक्त्व्य करणाऱ्या महाजनांचा पक्षाच्या वतीने धिक्कार करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी प्रा. मुकेश येवले, एम बी तडवी, अॅड देवकांत पाटील, मो.आबिद कच्छी, अरूण लोखंडे, कामराज घारू, सरदार तडवी, किशोर माळी, प्रकाश पारधे, फिरोज तडवी, किरण पाटील, गजानन राजपुत, भुरेलाल पावरा, पिंताबर महाजन, नरेन्द्र कोळी, राहुल चौधरी, पवन पाटील, निसार तडवी, नानासिंग बारेला, भैय्या बारेला आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.