वरणगाव स्टेट बँके चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आयुध निर्माणी वसाहतीतील स्टेट बँक इंडिया या शाखेच्या इमारतीच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, दरम्यान या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, आयुध निर्माणीच्या वसाहतीत स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असून, बॅकेच्या इमारतीच्या भिंतीला भगदाड पाडून चोरानी बॅकेतील कॅश काऊंटर लॉकर रूमचा लाकडी दरवाजा उघडून चोरी करण्याचा प्रयत्न दि २३ मे २०२३ रोजी केला होता, बँक व्यवस्थापक मनिष शर्मा यांच्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलीसात अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलीसांनी बँकेत लावलेल्या सि सि कॅमेऱ्यात कैद झालेले चोरांच्या छायाचित्राच्या आधारे तपास करीत चोरांच्या मागावर होते, मात्र घटना घडल्या पासुन ते गावातून पसार झाले होते.

दरम्यान दि २० बुधवार रोजी खबर्‍यानी दिलेल्या गुप्त माहीतीनुसार सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड, उप निरिक्षक परशुराम दळवी, उप निरिक्षक किशोर पाटील, उप निरिक्षक इस्माईल शेख, पो.हे.कॉ मनोहर पाटील, नावेद अली, पो.कॉ योगेश पाटील यांनी पिंपळगाव बु॥ गाठून वैभव पाटील, शुभम तळेले या दोघांना ताब्यात घेऊन वरणगाव पोलीस स्टेशनला आणून त्यांची चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले, मात्र पोलिसीखाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची अजून कसून चौकशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.