राज्य क्रिकेट पंचाच्या पॅनेलमध्ये जळगावचा वरूण देशपांडे

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकतेच घेतलेली क्रिकेट पंच परिक्षा वरूण देशपांडे यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. त्याने संपुर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे क्रिकेटच्या राज्य पंचांच्या पॅनेलमध्ये वरूणचा समावेश करण्यात आला.

वरूण देशपांडे यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस टी खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी यांच्यासह जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे रविंद्र धर्माधिकारी व सर्व सहकाऱ्यांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे वरुण चे वडील अरविंद देशपांडे हे जळगाव जिल्हातील क्रिकेटचे प्रथम अधिकृत पंच आहेत. त्यानंतर जळगावचे संदीप गांगुर्डे हे दुसरे तर वरुण देशपांडे हा जिल्ह्याचा तिसरा अधिकृत पंच म्हणून जबाबदारी स्वीकारेल.

Leave A Reply

Your email address will not be published.