शिवाजी नगरात रात्र शाळा उपक्रम सुरु…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे निमित्ताने आज दिनांक 20 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी शिवाजी नगर, जळगाव येथील महानगरपालिका शाळा क्रमांक १ येथे नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा भाग म्हणून रात्र शाळा भेट करण्यात आली. रात्र शाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव व श्री. अर्पित (आय ए एस प्रशिक्षणार्थी ) यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी अभिजीत बाविस्कर सहआयुक्त, दिपाली पाटील प्रशासनाधिकारी मनपा जळगाव, मुकेश सर व टीम हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ विद्या गायकवाड प्रशासक तथा आयुक्त जळगाव मनपा यांचे अधिपत्याखाली करण्यात आले.

उद्दिष्ट: 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना शिक्षण देणे ज्यांच्याकडे वाचन आणि लेखन कौशल्ये नाहीत, तसेच जे विविध कारणांमुळे 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.

विशेष म्हणजे यात लोकसहभागातून प्रशिक्षक म्हणून स्वयंसेवक होऊन सेवा देता येणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व समाजमनातून स्वयंस्फुर्तीने लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अभ्यासक्रम:

  1. मूलभूत संख्या आणि अक्षरे शिकवणे.
  2. आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, व्यावसायिक कौशल्ये, आरोग्यसेवा आणि जागरुकता, बाल संगोपन आणि शिक्षण आणि कुटुंब कल्याण मध्ये शिक्षण देणे.
  3. स्थानिक रोजगार सुरक्षित करण्यासाठी आणि मूलभूत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये सुसज्ज करणे.

प्रशिक्षक: समर्पित स्वयंसेवक शिक्षक.

पर्यवेक्षण आणि नोंदी: महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून पर्यवेक्षण.

Leave A Reply

Your email address will not be published.