रेल्वेच्या धक्क्याने २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील २३ वर्षीय युवकाचा पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ (Pachora Railway Station) धावत्या रेल्वेसमोर आल्याने दुर्दैवी मृत्यू (Unfortunate death) झाल्याची घटना दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२:१५ वाजता रेल्वे कि.मी. खंबा क्रं. ३७१/२/४ दरम्यान अप लाईनवर एका युवकाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मालगाडीच्या लोकोपायलटने पाचोरा रेल्वे स्टेशन मास्टर अनिल प्रताप यांना दिली. त्यानंतर ए.एस.आय. ईश्वर बोरुडे, शब्बीर शेख, पो.ना विलास जाधव, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मयताच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तपासा अंती मयताचे नाव सागर महाजन (२३) रा. शिव कॉलनी, पाचोरा अशी ओळख पटल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर सागर महाजन याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

घटने प्रकरणी पाचोरा रेल्वे पोलिसात (Railway Police)अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा पुढील तपास ए.पी.आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.