भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावाची पुन्हा चर्चा; होऊ शकतात ब्रिटनचे नवे पंतप्रधान…

0

 

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क:

ब्रिटनचे नवे पंतप्रधान लिझ ट्रस यांनीही राजीनामा दिला आहे. (New British Prime Minister Liz Truss resigns) बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या जागी सुमारे दीड महिन्यापूर्वी ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, त्यादरम्यान त्यांची भारतीय वंशाच्या ऋषी सुनक (Rishi Sunak of Indian origin) यांच्याशी निवडणूक लढत होती, परंतु ट्रस यांनी ऋषी सुनक यांचा पराभव करून पंतप्रधानपद काबीज केले होते.

आता ट्रस यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा होत आहे. मूळात सुनक हे दुसऱ्या क्रमांकावर होते, आता ही खुर्ची रिकामी झाल्याने सुनक पुन्हा आपल्या शर्यतीत उतरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातही ऋषी सुनक यांचे नाव समोर आले होते, जेव्हा त्यांनी ट्रसला मागे टाकले होते. या सर्वेक्षणानुसार, टोरी पक्षाच्या बहुसंख्य सदस्यांना ब्रिटीश पंतप्रधान लिझ ट्रस यांनी पद सोडावे असे वाटत होते आणि त्यापैकी 55% भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना पंतप्रधान बनवण्याच्या बाजूने होते. हे सर्वेक्षण खरे ठरले तर लवकरच ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू शकतात.

या सर्वेक्षणानुसार, 83 टक्के कंझर्वेटिव्ह (Conservative) सदस्यांनी सांगितले की ट्रस पंतप्रधान म्हणून खराब कामगिरी (Poor performance) करत आहेत. यापैकी 72 टक्के लोकांनी यापूर्वी पंतप्रधानपदासाठी त्यांना मतदान केले होते. केवळ 15 टक्के लोक ट्रसच्या समर्थनात होते.

Leave A Reply

Your email address will not be published.