मक्याच्या गोण्या चोरणाऱ्या तिघांना अटक

0

 

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील मुस्लिम कमिटीच्या ईदगाह जवळून भरलेल्या मक्याच्या गोण्या चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १३ नोव्हेंबर 2022 ते 16 नोव्हेंबर 2022 या कालावाधीत रात्री एक वाजेच्या सुमारास मुस्लिम कमिटीच्या ईदगाह मधून 15000 रुपये किमतीच्या मक्याने भरलेल्या एकूण 15 गोण्या (प्रत्येकी कट्ट्यात 58 किलो मका) आरोपी नाना शिवदास साळुंखे, अजय नाना साळुंखे, विजय नाना साळुंखे यांनी चोरून नेले. दरम्यान स्वतःचे फायदे साठी व फिर्यादीचे संमती वाचून लबाडीच्या इराद्याने चोरून नेत असताना फिर्यादी फारूक बिस्मिल्ला पिंजारी यांचे सुरक्षारक्षक इमाम युनुस पिंजारी यांनी बघितले असल्याने वरील तिघा आरोपींविरुद्ध फारूक पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ए.एस.आय नितीन चव्हाण करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.