स्टेट बँके ग्राहकाचे पंचेचाळीस हजार महिला चोराने केले लंपास

0

भडगाव – प्रतिनिधी

येथील बस स्थानक समोरील बढे सर कॉम्प्लेक्स मधील स्टेट बँकेत पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त शिपाई हे बँकेत आले. त्यांनी काऊंटर वर जाण्या पूर्वी आपली बॅग ही बाजूला असलेले टेबलावर ठेवली. व ते बँकेच्या कर्मचारी शी बोलू लागले. या वेळेत त्या ठिकाणी दोन महिला चोर आल्या व त्यांनी त्या बॅगेत ठेवलेले पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना काल दि.16 रोजी तीन वाजेच्या सुमारास घडली. ही सर्व घटना सी. सी.टी.व्ही फुटेज मध्ये कैद झाली असून या दोन्ही महिला चोरांचा तपास भडगाव पोलिस करत आहे. या बाबत भडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी – नामदेव शंकर पाटील वय 75 धंदा – पाटबंधारे सेवानिवृत्त शिपाई हे दि.16 रोजी स्टेट बँकेत आले होते. त्या वेळी  बँकेचे कर्मचारी यांचा लंच टाईम असल्याने काही वेळ थांबले. व कर्मचारी आल्यानंतर त्यांनी काऊंटर वर जाण्या पूर्वी आपल्या हातातील बॅग ही बाजूला असलेले टेबलावर ठेवली व ते कर्मचारी यांच्याशी बोलू लागले. यातच दोन महिला त्या बॅग जवळ गेले . व त्यातील 45,000 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही सर्व घटना बँकेतील सी. सी. टी. व्हीं.कॅमेरात कैद झाली. या बाबत नामदेव शंकर पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस स्थानकात गु. र.न.318/2022 भा.द.वी कलम 379 प्रमाणे अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय काळे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.