यशस्वी भविष्यासाठी मोठी स्वप्न बघा; प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कोणतही यश सहजाजसहजी मिळत नाही. यशाला शॉर्टकट नसतो तर जिद्द मेहनत अन् अभ्यासात सातत्य असेल, तर निश्चित यश मिळतेच तसेच जिद्द, चिकाटी, परिश्रम व जबाबदारी हे गुण अंगी असल्यास विदयार्थ्यांना यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. तसेच भविष्यात समाजाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी यशाचा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला. यावेळी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाची, विविध हॉबी क्लबची माहिती देत, क्लब मध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. व या विविध क्लबमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्व गुण, टीमवर्क स्किल हे सारे कौशल्य आत्मसात होण्यास मदत हौवून ही यशस्वी करिअरची एक उत्तम सुरवात आहे. चांगल्या बॉडी लँग्वेजने तुम्ही तुमचे करिअर उच्च स्तरावर नेऊ शकता व आजच्या काळात असे सर्वगुण संपन्नच युवकांची इंडस्ट्रीला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सर्व विभागाच्या ‘प्रारंभ’ या स्वागत समारंभ कार्यक्रमावेळी प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मानोगतात व्यक्त केले.

याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर व कार्निगी सर्टीफाईड ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी हे उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ. अग्रवाल पुढे म्हणाल्या की, उद्योग ४.० व एज्युकेशन ४.० ही चौथी ओद्योगिक क्रांती आहे जी बऱ्याच समकालीन ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा समावेश करते या क्रांतीसोबत आजच्या युवकांनी जुळायला पाहिजे तसेच जागतिक स्तरावरील बदलत्या घडामोडींचे आकलन करून संगणक, व्यवस्थापन व इतर पूरक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यावर भर द्यावा व या बदलत्या परिस्थितीत करिअरचे नियोजन कसे करावे यांचे अनेक उदाहरणांसहित त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रथम वर्षला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची माहिती देत महाविद्यालयातील मुबलक सुविधा, हॉबी क्लब, बस, लायब्ररी, मैदान, ग्रंथालय, जिम याबद्दलचीहि माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून प्रा. प्रिया टेकवानी, सिव्हील विभागप्रमुख शंतनू पवार, मॅकेनिकल विभागप्रमुख मुकुंद पाटील, कॉम्प्यूटर विभागप्रमुख सोनल पाटील, इलेक्ट्रीकल विभागप्रमुख तुषार पाटील, इलेक्ट्रोनिक विभागप्रमुख बिपासा पात्रा व प्रा. स्वाती बाविस्कर यांनी पार पाडली. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.