महिला कंडक्टरच्या कानशिलात लगविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

0

जळगाव ;- एसटी महामंडळाच्या बसमधील महिला कंडक्टरशी वाद घालून त्यांच्या कानात चापट मरणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शुक्रवारी ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बस इच्छादेवी चौकातून जात असतांना जळगाव ते जामनेर या बसमध्ये करण कमलसिंग परदेशी (वय २० रा. कंडारी ता. जळगाव ) हा तरूण बस मध्ये बसला होता महिला कंडाक्टर सुरेखा प्रविण पाटील वय-२५ रा. जामनेर यांनी कंडारी गावाला थांबा नसल्याचे सांगत करण परदेशी याला समजावून सांगितले. त्यामुळे नेरी पर्यंतचे तिकीट काढावे लागले असे महिला कंडाक्टर यांनी सांगितले. या कारणावरून याचा राग येत करण परदेशी याने महिला कंडाक्टर यांच्याशी वाद घालून दमदाटी केली.तसेच त्यांच्या कानशिलात चापट मारून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर महिला कंडाक्टर सुरेखा पाटील यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार रात्री ८ वाजता मारहाण करणारा करण कमलसिंग परदेशी रा. कंडारी ता.जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.