स्टेरिंग रॉड तुटल्याने कार शेतातील झाडावर आदळली ; तरुण ठार

0

जळगाव ;- स्टेरिंग रॉड तुटल्याने कार शेतातील झाडावर आदळून झालेल्या अपघातात राज महेंद्र शिरसाठ (वय १९, रा. सार्वे, ता. धरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी मुसळी ते चिंचपुरा दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील किर्तनकार गंभीर जखमी झाले .  त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

धरणगाव तालुक्यातील सार्वे गावात राज शिरसाट हा आपल्या आई आणि आजीआजोबांसोबत वास्तव्याला होता. आई मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर राज शिरसाट हा शिक्षण घेत होता. त्यांच गावात त्यांचे मामा देखील राहतात. गुरूवारी ४ एप्रिल रोजी दुपारी राज शिरसाट हा त्यांच्याच गावातील किर्तनकार सुरेश अशोक अहिरे सार्वेकर महाराज यांच्या कार क्रमांक (एमएच ०९ डीएक्स ८९९१ ) ने सार्वे गावातून जळगावला जाण्यासाठी निघाले.

दुपारी ३ वाजेच्या सुमारास चिंचपूरा ते मुसळी फाट्याच्या दरम्यान भरधाव वेगाने जात असतांना त्यांचा कार अचानक झाडाजवळ फेकली गेली. या अपघातात राजचा जागीच मृत्यू झाला. तर सार्वेकर महाराज हे जखमी झाले. रोडच्या बाजूला शाळेतील शिक्षक डी.के.पाटील यांनी अपघातस्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने कारमधून राजला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
भरधाव वेगाने जात असलेली कार झाडावर आदळल्याने कारच्या पुढील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला होता. या अपघातात कारमध्ये बसलेला राज शिरसाठ या तरुणाला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील सार्वेकर महाराज हे देखील गंभीर जखमी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.