भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना एकाला रंगेहाथ पकडले !

0

यावल वनविभागाची कारवाई

जळगाव ;- वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व तसेच वनविभागाच्या पथकाला ३ रोजी गुप्त बातमी वरुन मौजे काळाडोह पाड्यावर हवलदार नहारसिंग बारेला याला सापळा रचून त्याच्या राहत्या घरात भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना रंगेहाथ पकडले.

लोखंडी तारेच्या माध्यमातून विद्युत प्रवाह सोडून भेकरची शिकार केल्याचे तपासात समोर आले आहे .तसेच गुन्हा कामी वापरले गेलेले हत्यार देखील ताब्यात घेतले गेले आहेत. चौकशी साठी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गुन्हेकामी वनपाल डोंगर कठोरा यांनी प्र. रि. क्रमांक 03/2024 दी. 03.04.2024 नोंदवून आरोपीस आज दि. 04.04.2024 रोजी म. न्यायाधीश यावल यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची वन कोठडी सुनावली असून तपास सहा. वन संरक्षक प्रथमेश हाडपे करीत आहेत.

भेकर हे वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 मधे अनुसूची 1 मध्ये येत असून त्याच्या शिकारी साठी 7 वर्षा पर्यंत ची शिक्षा होऊ शकते. सदरची कार्यवाही म. जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव,प्रथमेश हाडपे सहा. वन संरक्षक यावल, स्वप्नील फटांगरे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कारवाईमध्ये यावल पूर्व वनक्षेत्रातील अधिकारी व सर्व क्षेत्रीय कर्मचारी सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.