लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाखांपर्यंत खर्चाची मुभा

0

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा असून त्यांनी या खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रचार करतानाच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर असेल. प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च याबाबतची अंतिम यादी तयार होईल त्याप्रमाणे खर्च गृहीत धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक दर निश्चितीसाठी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल पासून नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर दि. १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष व उमेदवारांचे प्रतिनिधी यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती बैठकीत दिली. यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रे, नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया, तसेच उमेदवारांना आवश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थांचे दर याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात महिलाकडून संचलित, दिव्यांग बांधवांकडून संचलित आणि युवकांकडून संचलित असे एकूण ६६ मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.

या मॉडेल मतदान कें द्रावर मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर, महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी (खर्च) चंद्रकांत वानखेडे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा नोडल अधिकारी राजेंद्र खैरनार, उपलेखा वित्त अधिकारी विनोद चावरिया, रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराचे प्रतिनिधी तुषार राणे, जळगाव लोकसभा उद्धव ठाकरे गटाचे विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अशोक लाड वंजारी, भाजपाचे दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे निलेश पाटील यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.