साउथ स्टार थलपथी विजयने केला नागरिकत्व कायद्याचा विरोध; म्हणाला, हे बंधुत्वासाठी आहे संकट…

0

 

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने CAA ची अधिसूचना जारी केली आहे. आता 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळू लागेल. CAA लागू झाल्यानंतर अनेक लोक त्याचा विरोध करत आहेत. यामध्ये एक नाव आहे साऊथ स्टार थलपथी विजयचे, ज्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 च्या अंमलबजावणीला विरोध केला आहे आणि तामिळनाडूमध्ये हा कायदा लागू होऊ देऊ नये असे आवाहन केले आहे.

थलपथी विजय यांनी सीएएबाबत असे सांगितले

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर लगेचच थलपथी विजय त्यांच्या ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले – ‘देशातील सर्व नागरिक सामाजिक सलोख्याने राहतात अशा वातावरणात भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) सारखा कोणताही कायदा लागू करणे मान्य नाही.’ यासोबतच विजय यांनी आपल्या पोस्टद्वारे तामिळनाडू सरकारला विनंती केली की, हा कायदा तामिळनाडूमध्ये लागू करू नये.

2 फेब्रुवारी रोजी, थलपथी विजयने अलीकडेच अधिकृतपणे तामिलागा वेत्री कळझम नावाच्या स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यांच्या राजकीय पक्षाच्या घोषणेनंतर थलपथी विजय यांचे हे पहिले विधान आहे, जे सध्या चर्चेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.