शिंदे पुन्हा ठाकरेंसोबत ? शंभूराज देसाईंचे वक्तव्य…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अजित पवार पुन्हा मंत्रिमंडळात आल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा आहे. याबद्दलची आता सर्वात महत्वाची बातमी समोर येत असून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाण्याबद्दल एक मोठे विधान केले आहे.

याबाबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर बंडखोर नेत्यांनी पक्ष संपत असल्याचं विधान केलं होते. अजित पवार निधी देत नव्हते, ते पक्ष संपवत होते आणि राष्ट्रवादी वाढवत होते, असा ठपका ठेवण्यात आलेला होता. त्यानंतर आता थेट अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्ष सत्तेत भागीदार झाल्याने शिंदे गट नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत आता शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना “आता परत उद्धव ठाकरे यांनी हाक दिली, आम्ही एकत्र येतो करून तर तुम्ही मान्य करणार का? असा प्रश्न त्यांन विचारण्यात आला.

त्यावर बोलताना “हा जर तर हा पुढचा विषय आहे. ज्यावेळी हाक येईल तेव्हा साद दिली जाईल असे म्हणत त्यांच्याकडून तशी साद आली तर सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ.” असे मोठे विधान केले आहे. शंभुराज देसाई यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे महत्वाचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.