फुलगाव येथे तरुणाची विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील तरुणाने बोदवड रस्त्यावरील नागेश्वर महादेव मंदिराजवळ विषारी  द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि ४ रोजी सांयकाळच्या सुमारास उघडकीस आली.

या बाबत वरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील फुलगाव येथील तरुण ग्रामीण रुग्णालयाच्या समोर चाट सेंटर चालक कल्पेश चंद्रकात चौधरी (२६) याने बोदवड रस्त्यावरील नागेश्वर महादेव मंदिराच्या समोरील कचरा डेपो जवळ विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे उप निरिक्षक आशिष आडसुड सह पो निरिक्षक परशुराम दळवी स.पो.नि शे. इस्माईल शेख, पो हे कॉ नागेंद्र तायडे घटनास्थळी गेले.

कल्पेश याने काही दिवसांपूर्वीच वरणगाव ग्रामीण रुग्णालयासमोर दिव्य चाट सेंटर दुकान सुरु केले होते. गेल्या दोन दिवसांपासून दुकान बंद करून कुठेतरी निघुन गेल्याने घरच्यांनी नातेवाईकांकडे व मित्रमंडळीकडे त्याचा शोध घेतला होता. दरम्यान मयताच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्याच्या खिशातील पाकीटात असलेल्या आधार कार्डच्या वरून त्याची ओळख पटली. मात्र त्याचा पत्ता लागला नव्हता. त्याच्या पश्चात आई वडिल दोन भाऊ असा परिवार असून त्याच्या या टोकाच्या उचलेल्या पाऊला मुळे हळहळ व्यक्त केली जात आहे

या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला वडिल चंद्राकात चौधरी यांच्या खबरी वरूण अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सह पोलीस निरिक्षक किशोर पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.