पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील प्रकार
पाचोरा. तालुक्यातील लोहारा येथे एका बँकेतील वसुली अधिकारी थकीत हफ्ता वसूल करण्यासाठी गेले असता थकबाकीदाराने हफ्ताची रक्कम दिल्यावर त्याला मोबाईलवर पैसे मिळाल्याची रिसीट टाकताच थकबाकीदाराने ५६ हजारांची राक्क्म हिसकावून वसुली अधिकाऱ्याला शिवीगाळ करून चाकूने मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बसस्टँडवर ९ रोजी घडला . याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव येथे राहहनारे यशवंत मराठे हे एचबीडी फायनान्स कंपनीत वसुली अधिकारी असून ते ८ रोजी लोहारा येथे आरोपी मुकुंदा समाधान शिंदे यांच्याकडे थकीत हफ्त्याची रक्कम वसुलीसाठी गेले असता मुकुंदा शिंदे याने ५६ हाजरी ५०० रुपये दिले . मात्र हे पैसे मिळताच यशवंत मराठे यांनी मुकुंदा शिंदे यांच्या मोबाईलवर पैसे मिळाल्याची रिसीट टाकताच मुकुंदा शिंदे याने ५६ हजार ५०० रुपये हिसकावून रिसिटवर तुमचे नाव नाही आहे. असे म्हणून यशवंत मराठे यांना शिवीगाळ करून माझ्यावर भरपूर केसेस असून तुला चाकूने मारेल अशी धमकी देऊन दम दाटी केली. यावरून यशवंत मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला आरोपी मुकुंदा शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि महेंद्र वाघमारे करीत आहे .