जळगाव ;- शहरातील टॉवर चौकातून रिक्षाचालकांचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लाम्बवलीयाची घटना १० रोजी सकाळी घडली असून याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , प्राजापत नगर येथे राहणारे प्रवीण निंबा पाथारे हे व्यवसायाने रिक्षाचालक असून १० रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास टॉवर चौकात खाडी भांडार समोर रोडवर आले असता अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राजकुमार चव्हाण करीत आहे.