होय! मला अध्यक्ष करणार होते, मात्र .. सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट !

0

पुणे ;- राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याच्या घोषणेनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांनी आपला राजीनामा परत घेतला होता. त्यामुळे शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतल

छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भुजबळ म्हणाले, शरद पवार यांनी राजीनामा देणं हे काही थेट झालं नव्हतं. १५ दिवस आधीच हा विषय झाला होता. त्यांच्या घरात याविषयी चर्चा झाली होती, कदाचित अजित पवारांना हा विषय माहिती असावा. खरंतर, तेव्हा असं ठरलं होतं की शरद पवारांनी राजीनामा द्यायचा. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाचं अध्यक्षपदी नेमायचं आणि मग राष्ट्रवादीने भाजपाबरोबर जायचं. त्यामुळेच त्यांनी अचानक राजीनामा दिला. शरद पवार राजीनामा देणार आहेत याची मलाही कल्पना नव्हती.

यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या कि , शरद पवार मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष करणार होते. तसा प्रस्ताव होता. परंतु, ही गोष्ट मला स्वतःला अस्वस्थ करणारी होती. कारण त्यात तीन गोष्टी होणार होत्या. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा नव्हती. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, असं शरद पवार सगळ्यांना म्हणाले होते, आणि स्वतः काल भुजबळ यांनीदेखील त्याची कबुली दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला अस्वस्थ करणारी दुसरी गोष्ट म्हणजे, आमची वैचारिक बैठक वेगळी आहे. आमची वैचारिक बैठक ही यशवंतराव चव्हाण यांची, शरद पवार यांची आहे. या माणसांची विचारधारा हीच आमची विचारधारा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, मी अध्यक्ष झाले असते तर सर्वात आधी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असता, जे माझ्यासाठी शक्य नव्हतं. कारण मी माझ्या विचारधारेशी, माझ्या वडिलांच्या विचारांशी तडजोड करू शकत नव्हते. माझ्यासाठी ते अशक्य होतं. माझ्या विचारधारेशिवाय मी कशी जगणार?शरद पवार गटातील नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, एका बाजूला सत्ता होती आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा निर्णय घेतला. छगन भुजबळ बोलले ते खरं आहे, मला अध्यक्ष करणार होते. परंतु, मी माझ्या विचारधारेवर ठाम राहिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.