पालकांना पाहताच शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून मुलीने उडी घेऊन संपविले जीवन

0

सांगली ;– एका खाजगी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन विद्यार्थिनीने पालकांसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकारसांगलीच्या कुपवाड येथील बामणोली येथे घडला आहे. एक नामांकित शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीने शाळेतच आत्महत्या केल्याने शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे या मुलीने शाळेतून सुट्टी झाल्यावर बॅग शाळेतील व्हॅन मध्ये ठेवली. तिचे आई वडील शाळेत आलेले होते हे पाहून ती थेट शाळेच्या गेट मधून आत गेली आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन तिथून उडी घेतली. खाली पडल्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.ती गंभीर जखमी झाली. तिला पालकांनी आणि शाळा प्रशासनाने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत मुलीने आत्महत्या का केली याचा तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.