अल्पवयीन बहिणीवर भावांचा वारंवार बलात्कार, पीडिता गर्भवती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मुंबईच्या विक्रोळी भागात बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आलीय. दोन भावांनी पॉर्न व्हिडीओ आणि अश्लील फोटो दाखवून आपल्या लहान बहिणीवर वारंवार बलात्कार केला आहे.

 23 आठवड्यांची गर्भवती 

मिळालेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबीयांसोबत विक्रोळीमध्ये राहते. आई-वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर असायचे. याच संधीचा फायदा घेत त्याच भागात राहणारे चुलत भाऊ नेहमी घरी यायचे. मुलगी घरी एकटी असल्यामुळे चुलत भाऊ तिची काळजी घेत आहेत, असा त्यांचा समज आई वडिलांचा असल्याने तेही निर्धास्त होते. दरम्यान 31 डिसेंबर रोजी आईला मुलीमध्ये बदल जाणवला. आपल्या मुलीचे पोट सामान्य स्थितीहून मोठे झालेले दिसून आल्यामुळे मुलीला आईने विचारणा केली. त्यावर तिने उडवाउडवीची उत्तर दिली. आईने काळजीपोटी मुलीला जवळील रुग्णालयात नेले, डॉक्टरांनी तपासणी केली असता मुलगी 23 आठवड्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

वारंवार बलात्कार

या प्रकरणी गंभीर दखल घेत पीडितेचा आणि तिच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवले आणि दोघा नराधमांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे बलात्कार करण्यापुर्वी तिला अश्लिल व्हिडीओ आणि फोटो दाखवत असे. 18 वर्षीय चुलत भावाने मे महिन्यात पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला. तर, दुसऱ्या 22 वर्षीय चुलत भावाने ऑगस्टमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. ती पुढे म्हणाली की, 22 वर्षीय चुलत भावाने माझ्यावर वारंवार बलात्कार केला तर 18 वर्षीय चुलत भावाने अनेक वेळा माझा लैंगिक छळ केला आहे.

दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा

आरोपपत्रात मुलीचा वैद्यकीय अहवाल पुरावा म्हणुन वापरला जाईल. दोन्ही नराधमांना अटक करण्यात आली आहे. 22 वर्षीय नराधमाला 31 डिसेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली, तर 18 वर्षीय नराधमाला सोमवारी अटक करण्यात आली आहे. दोन्ही नराधमांवर 376 (2) (n) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे), 376 (DA) (16 वर्षांखालील महिलेवर सामूहिक बलात्कार) अशा विविध कलमांसहित पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.