मुक्ताईनगरात महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकले ; आ. चंद्रकांत पाटलांची भेट

0

मुक्ताईनगर ;- महावितरणच्या मुक्ताईनगर विभागातील कंत्राटी कामगाराना २ महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने त्यांनी उपोषण सुरु केले असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी चर्चा करून कामगाराचे थकीत वेतन देण्यात यावे याबाबत चर्चा केली . याबाबत माहिती अशी कि ,

महावितरण,मुक्ताईनगर विभागातील कंत्राटी कामगारांना ठेकेदार अज्जूभाई इलेट्रिकल या एजंशीने कामावरून कमी केलेले असुन् तसेच निविदा मिळाल्यापासून आतापर्यन्त कामगारांचे वेतनही सदर एजन्सीने केलेले नाही.

म्हनुन2 महिन्यापासून कामगार वेतानाविना त्यांचे कर्तव्य आताप्रयत्न चोख बजावित आहे. त्यांची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याने त्यांनी उपोषण आरंभिले आहे. तसेच

कामावरून कमी केलेले कामगार यांना परत कामावर पूर्वरत हजर करून घ्यावे तसेच सर्व कामगारांचे वेतन ठेकेदाराने करावे यामागणीसाठी तशसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येऊन याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

आंदोलन स्थळी माजी महसूल मंत्री,एकनाथराव खडसे,रोहिनीताई खेळवलकर,चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर,डॉ. जगदीश पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस आदिनी उपस्थिती दिली. तहसीदार ,तसेच महावितरण प्रशासनास् जाब विचारून त्वरित हा प्रश्न निकाली निघावा ह्या करिता प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.