दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दुपारी 1 वाजता दहावी बारावीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या पुरवणी परीक्षांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

दहावी पुरवणी परीक्षा

दहावी पुरवणी परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण २०५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ५८०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ३०.४७ आहे. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ७६४२ एवढी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ए.टी.के. टी. सवलतीद्वारे इयत्ता ११ वी च्या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.

बारावी पुरवणी परीक्षा

बारावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण ५४०५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १७२८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ३२.२७ आहे.

‘ या’ संकेतस्थळावर पहा निकाल

http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. या संकेत स्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होणार आहेत. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुस-या दिवसापासून दहावी, बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ठ झालेलया विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने शाळा, महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

गुणपडताळणीसाठी शनिवारपासून करा अर्ज

गुणपडताळणीसाठी ३ ते १२ सप्टेंबर पर्यंत व छायाप्रतीसाठी ३ ते २२ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीन अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.