थोडक्यात बचावल्या अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडिस…(व्हिडीओ)

0

 

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क;

अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडिज (Cristina Fernández) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. उपराष्ट्रपती क्रिस्टिना घराच्याबाहेर लोकांना भेटत होत्या, तेवढ्यात एका अज्ञात बंदुकधारीने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी ट्रिगर अडकल्याने त्या थोडक्यात बचावल्या.
मात्र, उपराष्ट्रपतीच्या घराच्या परिसरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या बंदूकधारी व्यक्तिला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात असल्याचे वृत्त आहे.

अर्जेंटिनाच्या सुरक्षा मंत्र्यांनी स्थानिक वृत्तवाहिनी C5N ला सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ते म्हणाले- हल्लेखोराने उपराष्ट्रपतींच्या चेहऱ्याजवळ बंदूक रोखली होती. घटनेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. संशयित क्रिस्टिना यांच्या समोर येताच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. ही बंदूक खरी होती की नाही, याचाही तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.