अशोक चव्हाणांनी घेतली फडणवीसांची भेट; चर्चांना उधाण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Former CM Ashok Chavan) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अशोक चव्हाण हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने राज्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसही फुटणार ? 

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजप सोबत हातमिळवणी केल्यानंतर राज्यात सत्ता स्थापन केली. दरम्यान आता काँग्रेसनेही आपला मोर्चा भाजपकडे वळवला आहे काय ? अशा चर्चा राजकीय गोटात होत आहेत. तसेच काँग्रेसही लवकरच फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

काँग्रेसचा मोठा गट भाजपात येणार ?

राज्यातील मंत्री मंडळाच्या दुस-या टप्प्यात दोन महिलांनाही स्थान मिळणार आहे. तसेच काँग्रेसचेही दोन मंत्री या मंत्रिमंडळात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचा एक मोठा गट येत्या काही दिवसांत भाजपात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन माजी मंत्र्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत हा विस्तार पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.