किरॉन पोलार्डचा चित्तथरारक झेल…(व्हिडीओ)

0

 

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क;

प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहितच आहे की, किरॉन पोलार्ड एक चपळ क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडे बॅटने चेंडू स्टेडियमच्या बाहेर पाठवण्याची ताकद आहे. सध्या सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात पोलार्डने त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार अल्झारी जोसेफचा अप्रतिम झेल टिपला.

https://twitter.com/FanCode/status/1565389297192017920?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1565389297192017920%7Ctwgr%5E24d9568f713fa80d4302f0ae51eb9b78d1719506%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fpollards-incredible-catch-created-panic-on-the-internet-watch-video-hindi-3308839

 

या चित्तथरारक झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराने डावाच्या शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हा झेल घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सील्सच्या चेंडूवर अल्झारीने लॉग ऑनवर शॉट खेळला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या पोलार्डच्या उडीचे टायमिंग इतके योग्य होते की त्याने एका हाताने शानदार झेल टिपला. उडी मारून तो सीमारेषेच्या आत पडणार होता, पण प्रेजेंस ऑफ माइंड वापरून त्याने चेंडू हवेत फेकला आणि मग आत येऊन तो झेल पकडला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सेंट लुसिया किंग्सने प्रथम फलंदाजी केली आणि संघाने 20 षटकात 143/9 धावा केल्या. त्रिनबागो नाईट रायडर्सकडून रोशॉन प्राइमसने 38 धावा केल्या तर अकील होसेनने चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर टियोन वेबस्टरने 58 धावा केल्या आणि त्रिनबागो नाइट रायडर्सने तीन गडी आणि चार चेंडू राखून लक्ष्याचा पाठलाग केला. टीम सेफर्टनेही 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

Leave A Reply

Your email address will not be published.