संसदेच्या शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो हटविले

0

नवी दिल्ली ,लोकशाही न्यूज नेटवर्क
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याचे फोटो देखील हटविण्यात आले आहेत. संसद भवनातील तिसऱ्या मजल्यावर शिवसेनेचं हे कार्यालय आहे.

संसदेतील शिवसेना कार्यालयात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटो ऐवजी एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहेत.याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो शिवसेना संसदीय कार्यालयात लागल्याचे दिसून येत आहे.

संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो भिंतीवरून हटवण्यात आले आहेत. त्याऐवजी आता एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे लावण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर गल्ली ते दिल्ली फरक जाणवू लागला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे यांनी ताबा घेतला त्यानंतर आता हा बदल दिसून आला आहे. आधी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो होते. आधीच्या रचनेतून या दोघांचे फोटो काढण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.