शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे ब्लू टिक गेले

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पक्षनावावरील दावा संपला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे केले. शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरील नाव बदलल्याने ट्विटरच्या नियमांनुसार ठाकरे गटाला ब्लू टिकसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.
या हँडलला दोन लोक फॉलो करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मोठे बदल केले आहेत.

ट्विटरच्या नियमांनुसार कोणतेही हँडल अधिकृत आहे की नाही हे तपासले जाते व त्यानंतर त्याला ब्लू टिक देण्यात येते. एकदा ब्लू टिक मिळाल्यानंतर काही बदल खातेदाराला कधीही करता येतात. त्याचा ब्लू टिकवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, अधिकृत झालेल्या आणि ब्लू टिक मिळालेल्या खात्याचे हँडल नेम बदलले तर ट्विटर संबंधित खात्याचे ब्लू टिक काढते. त्यामुळे पुन्हा ब्लू टिक हवे मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो.

Leave A Reply

Your email address will not be published.