दमास्कसवर इस्रायलने केला हल्ला ; १५ जण ठार

0

दमास्कस , लोकशाही न्यूज नेटवर्क
सीरियाची राजधानी दमास्कसमधील निवासी इमारतींवर रविवारी सकाळी इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. दमास्कसवर इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याआधी, शुक्रवारी सीरियामध्ये एक हल्ला झाला होता. ज्यात सुमारे 53 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यासाठी इसिसला जबाबदार धरण्यात आले होते. सीरियाच्या सरकारी मीडियाने सांगितले की, गेल्या एका वर्षातील हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे.

सरकारी टीव्हीनुसार, होम्सच्या पूर्वेकडील वाळवंटातील अल-सोखना शहराच्या नैऋत्य भागात ISIS च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 53 लोक मारले गेले. याबद्दल पालमायरा रुग्णालयाचे संचालक वालिद ऑडी यांनी सांगितले की, मृतांमध्ये ४६ नागरिक आणि सात सैनिकांचा समावेश आहे. वालिद ऑडी यांनी सरकार समर्थक रेडिओ स्टेशनला सांगितले की डझनभर लोकांना लक्ष्य केल्यानंतर मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते. यूकेस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सनेही शुक्रवारी या हल्ल्याची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.