शेतकऱ्याने शेतात साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

आज छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवजयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने शिवाजी महाराजांची अनोखी प्रतिमा साकारली आहे. या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये गहू पीक उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकृती साकारली आहे. कुणाल विखे असं लोणी गावातील शेतकऱ्याचे नाव आहे.

कुणाल विखे या तरुण शेतकऱ्याने गहू पीक उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती साकारली आहे. यासाठी कुणाल विखे हे गेल्या 5 दिवसांपासून मेहनत घेत होते. सुरुवातीला शिवरायांची रांगोळी काढून त्यामध्ये त्यांनी गव्हाचे बियाणे टाकले होते. त्यानंतर त्यांनी गहू पिकाला पाणी दिले होते. गहू उगवून येण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागला होता. या प्रतीकृतीची लांबी 24 फूट असून रुंदी 18 फूट आहे. यासाठी 10 किलो गव्हाच्या बियाणांचा वापर करण्यात आला आहे. या शेतकऱ्याचा व्हीडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.