साकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

0

मनवेल ता.यावल , लोकशाही न्युज नेटवर्क
साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. जे.महाजन होते तर व्यासपीठावर पर्यवेक्षक एस.जे. पवार, बी. ई. महाजन , वाय. बी. सपकाळे, एन. पी. पाटील, आर. सी. जगताप , किरण कुमार चौधरी,उपस्थित होते यावेळी महाराष्ट्राचे राज्य गीताचे सामूहिक गायन करण्यात आले .
यानंतर मान्यवरांचा शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. जे. महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी, जाणता राजा, शिवचरित्र, स्वराज्य, धर्मनिरपेक्षता सहिष्णुता, गनिमी कावा,मराठा साम्राज्य याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री आर सी जगताप यांनी केले, तर आभार एन. पी. पाटील यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.