शिवसेनेने ८ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गुरुवारी लोकसभेची पहिली यादी प्रसिद्ध करताना ८ उमेदवार जाहीर केले. यात ७ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे, तर रामटेकमध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली गेली आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा समावेश नाही.

महायुतीच्या उमेदवारांची गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाणार होती. मात्र भाजप आणि मित्रपक्ष शिवसेना-राष्ट्रवादीतीलजागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेलानाही. त्यामुळे पत्रकार परिषद टाळूनमुख्यमंत्री शिंदेंनी गुरुवारी सायंकाळी शिवसेनेच्या ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

शिंदे गटाचे हे ८ उमेदवार

दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे
कोल्हापूर : संजय मंडलिक
शिर्डी : सदाशिव लोखंडे
बुलढाणा : प्रतापराव जाधव
हिंगोली : हेमंत पाटील
मावळ : श्रीरंग बारणे
हातकणंगले : धैर्यशील माने
रामटेक : राजू पारवे

Leave A Reply

Your email address will not be published.