शिरसोली येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत दगडफेक ,5 ते 6 जण जखमी

0

जळगाव – तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत अज्ञात समाज कंटकानी केलेल्या दगडफेकीत 5 ते6 जण जखमी झाल्याची घटनारात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.यावेळी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी गावात तणाव पूर्ण शांतता होती.

 

तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येत असते. गुरुवारी दि. २८ मार्च रोजी देखील संध्याकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरा नगर येथून मिरवणूक ढोलताश्यांच्या गजरात निघाली होती. यावेळी तरुणांचा जल्लोष दिसून येत होता. दरम्यान, रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक वराड गल्ली येथे आली. तेथे काही काळ ढोलताशे बंद केले. त्याचवेळी अचानक जवळील प्रार्थनास्थळावरून अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक सुरु केली. यामुळे मिरवणुकीतील तरुण जखमी झाले. काहींच्या घरावर देखील दगड पडल्याने त्यांच्यातही विशाल दिलीप पाटील (वय २५, रा. शिरसोली) हा जखमी झाला.

बंदोबस्तावर असलेले पोलिसदेखील जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेत मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह ५ ते ६ जण जबर जखमी आहेत.  घटनास्थळी  पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व एलसीबीचे पोलिस निरीक्षक नजन पाटील हे पोहोचले  गावात तणाव पूर्ण शांतता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.