शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत हिंडवण्यासाठी नाही-उद्धव ठाकरे

0

जळगाव:- भाजपसोबत अनेक वर्षे कामे केली. भाजप सोबत असून शिवसेनेची भाजप झाली नाही, त्यामुळे आम्ही देखील शिवसेनेला कमळाबाईची पालखी वाहायला देणार नाही, कमळा बाईची पालखी वाहायला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म नाही दिला. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत हिंडवण्यासाठी नाही केला, असा टोला शिवसेना उठावा चे उद्धव ठाकरे यांनी आज जळगावात आयोजित वचनपूर्ती सभेत केला.

याप्रसंगी शिवसेनेचे खासदार संजय राऊत ,महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील सुनील महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,नितीन लड्डा, यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी 20 परिषदेच्या गडबडीत असून आपले बेकायदा मुख्यमंत्री सुद्धा परिषदेला गेले आहेत. त्या ठिकाणी ऋषी सुनक यांच्याशी भेट झाली. भेटीदरम्यान काय बोलणं झालं? ते काय बोलले कळलं का? तुम्ही बोलले ते त्यांना कळले का? का? फक्त फोटो काढून आले, नुसती चमकोगिरी चालू आहे., अशी सणसणीत टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.

‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’, अशी बॅनर लावण्यात आले, आणि हे खरंच आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बॅनरबाजीला आम्ही देखील बॅनरबाजीतून उत्तर दिलं. ते असं की, ‘आम्ही देखील 20-25 वर्ष भाजपसोबत होतो, तेव्हा शिवसेनेची भाजपा झाली नाही, तस काँग्रेससोबत गेलो, म्हणून शिवसेनेची काँग्रेस होणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खरपूस टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सरदार पटेलांनी त्याकाळात आरएसएसवर बंदी देखील आणली होती. म्हणजे त्यांना देशप्रेम काय हे कळत होते, पुतळ्याची उंची ठीक आहे. कामाची उंची कधी गाठणार असा टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावा आहे. आता भारत बोलावे लागेल कारण आजपर्यंत इंडियाचा गवगवा करणाऱ्यांना इंडियाच्या नावाने खाज सुटायला लागली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. पटेलांनी अभिमानाने मराठवाडा स्वातंत्र करुन घेतला. जशी कारवाई सरदार पटेलांनी मराठवाड्यात केली तशी कारवाई करण्याची हिंमत यांच्यात मणिपूरमध्ये दिसली नाही. आणि स्वत: ला पोलादी पुरुष म्हणून घेताय. तुम्ही तकलादू पुरुष आहात अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

जळगावातील शिवसैनिकांची तरूण पिढी ही पक्षाला पुढे नेत असून पक्षप्रमुख म्हणून आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो. आता वाटेत कुणी आडवं आलं तर त्यांना बघूनच घेऊ !” अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना-उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.