ड्रग्जचे पार्सल आल्याचे सांगून जळगवच्या महिलेची सव्वा तीन लाखंत फसवणूक

0

जळगव :- तुमचे नावाने अंधेरी मुंबई येथुन तैवान येथे एक पार्सल गेले आहे. त्यात तुमचे कपडे, क्रेडीट कार्ड, पासपोर्ट, ड्रक्स (MDMA),असुन ड्रक्स असल्यामुळे सदर पार्सल हे परत आलेले आहे. असे खोटे भासवुन
बँकेची माहिती घेऊन बँक खात्यामधील सव्वातीन लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार जळगाव येथे उघडकीस आला असून याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने फिर्याद दिल्यावरून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील द्रोपती नगर मध्ये राहणाऱ्या ऋतुजा विजयानंद पवार वय 32 या खाजगी नोकरी करीत असून त्यांना
दिनांक ०८/०९/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.१८ वा.चे सुमारास ऋतुजा ह्या घरी असतांना फिर्यादीचे मोबाईल नंबरवर फेडेक्स कुरीअर कंपनी मधिल एक अनोळखी इसमाने त्याचा मोबाईल नंबर वरुन फोन आला की तुमचे नावाने अंधेरी मुंबई येथुन तैवान येथे एक पार्सल गेले आहे. त्यात तुमचे कपडे, क्रेडीट कार्ड, पासपोर्ट, ड्रक्स (MDMA),असुन ड्रक्स असल्यामुळे सदर पार्सल हे परत आलेले आहे. असे खोटे भासवुन त्याने फिर्यादीशी सायबर क्राईम फोनवरुन बोलनी करुन फिर्यादी कडुन फिर्यादीचे बँकची माहीती काढुन घेवुन फिर्यादीचे HSBC बँक अकाऊन्ट मधुन ३,२६,०८७/- रुपये काढुन घेत फसवणुक केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर ऋतुजा यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना सुवर्णा तायडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.