फरार आरोपीला अटक; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

0

जळगाव :- चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयित आरोपींपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी ५ एप्रिल रोजी अटक केली होती. त्यातील इतर चौघे फरार झाले होते. यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

विशाल राजु अहीरे, आशुतोष सुरेश मोरे दिक्षांत देविदास सपकाळे, शुभम भिकन चव्हाण, गोपाल सिताराम चौधरी सर्व रा. रामेश्वर कॉलनी परीसर असे मेहरूण बगीच्या जवळ रात्री १० वा च्या सुमारास अंधारात काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत ची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी आशुतोष सुरेश मोरे हा गावठी कट्टयासह मिळुन आला होता. ईतर सर्व पळुन गेले होते. त्यात विशाल राजु अहीरे हा सुध्दा गुन्हा घडला दिवसापासून फरार होता.

या दरम्यान पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, सुमारे फरार असलेला सदर गुन्हयात पाहीजे असलेला विशाल राजु अहीरे हा रेल्वेने जळगाव येथे येत आहे. खात्रीशीर बातमी मिळाल्याने जळगाव रेल्वे स्टेशन येथुन पोउनी दिपक जगदाळे, सफो अतुल वंजारी, पोना, सुधीरसावळे., इमरान सैय्यद, योगेश बारी, पोका साईनाथ मुंडे अशानी रेल्वे स्टेशन मधुन बाहेर पडत असतांना ताब्यात घेतले होते व त्यास अटक करण्यात आली. त्याला न्यायमुर्ती श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांचे न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कस्टडी रीमांड देण्यात आली आहे. त्याचेवर यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे ७ शनीपेठ येथे १ गुन्हा दाखल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.