स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून पत्नीवर विळ्याने केले वार

0

जळगाव कंपनीत दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी परतलेल्या पत्नीला पतीने स्वयंपाक करण्याच्या कारणावरून वाद घालून या वादाच्या कारणावरून त्याने हातात विडा घेऊन तिच्या उजव्या कानावर वार करून तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना आठ रोज सायंकाळी सहा ते दहा वाजे दरम्यान  घडली. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की रामेश्वर  कॉलनीतील गजानन मंदिराजवळ राहणाऱ्या मंगला सुभाष उमाळे वय 34 या आठ सप्टेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर गेल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरी परत आल्यावर पती सुभाष शंकर उमाळे वय 40 याने स्वयंपाक करण्याच्या कारणावरून वाद घातला यावेळी मंगला यांनी मी आता कंपनीतून थकून आले असून स्वयंपाक थोड्या वेळात करून देते असे सांगितले. मात्र स्वयंपाक उशिरा केल्याचा राग मनात धरून पत्नी मंगला उमाळे यांना मारहाण करून संतापाच्या भरात विळा घेऊन तिच्या कानावर

वार केले व दुखापत केले. याबाबत मंगला उमाळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.