अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

0

अमळनेर:- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारे तेरा वर्षीय मुलगी हिला सार्वोटे तालुका अमळनेर येथील साहिल आणि भुऱ्या दोघांची पूर्ण नाव माहित नाही यांनी अमळनेर येथील बस स्थानकावरून सकाळी साडेअकरा वाजता सुमारास मोटरसायकलवर फिरविण्याचा उद्देशाने बसवून त्या अल्पवयीन मुलीला धार तालुका अमळनेर गावाजवळील पीर बाबाच्या टेकडी जवळ नेऊन दमदाटी करून जबरदस्तीने तिच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली याप्रकरणी पिढीतेने दोघांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून साहिल आणि भुऱ्या यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.