टास्क पूर्ण करून नफा देण्याचे आमिष देऊन तरुणाची नऊ लाख रुपयांमध्ये फसवणूक

0

जळगाव :- दोन अज्ञात व्हाट्सअप धारकाने करुणाचा विश्वास संपादन केल्यानंतर टास्क पूर्ण करून त्यामध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा देण्याचे खोटे आश्वासन देऊन वेळोवेळी तरुणाच्या बँक खात्यातून आठ लाख 82 हजार रुपयांची रक्कम स्वीकारून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की चेतन कन्हैया फिरके वय 31 राहणार गिरीजा कॉलनी भुसावळ रोड तालुका जामनेर याच्या मोबाईल क्रमांकावर राजचंदिका आणि अभिजीत सुमित राव या दोन अज्ञात नावाच्या व्हाट्सअप धारकांनी आणि टेलिग्राम धारकांनी चेतन फिरके याला वेळोवेळी संपर्क साधून टास्क पूर्ण केल्यास अधिक नफा देण्याचे खोटे आश्वासन देऊन वेळोवेळी फिर्यादीच्या बँक खात्यातून 31 ऑगस्ट 2023 ते 9 सप्टेंबर 2023 पर्यंत 88 हजार रुपयांची रक्कम स्टेट बँकेच्या खात्यातून काढून घेतली. तसेच फिर्यादीला टास्क बद्दल भरलेल्या रकमेपैकी केवळ हजार आठशे पंचवीस रुपये वेळोवेळी पाठवले तसेच जेपीजी स्वरूपात एक बनावट लिटर पाठवले असून त्यावर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज असलेला व भरलेली संपूर्ण रक्कम व नफा मला परत न करता माझी फसवणूक केल्याप्रकरणीची फिर्याद चेतन फिरके यांनी दिल्यावरून जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक किसनराव पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.