जळगावचे सराईत दुचाकी चोरटे जाळ्यात

0

नाशिक : जळगाव येथील सराईत दुचाकी चोरट्यांना उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या दुकलीच्या अटकेने नाशिक, जळगाव, छ. संभाजीनगर आणि मध्यप्रदेशातील चोरीचा उलगडा झाला असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे पावणे सात लाख रूपये किमतीच्या दहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. अजय शंकर चव्हाण (वय २९) व उत्तम प्रेमा पवार (वय ३२ रा. दोघे सुप्रिम कॉलनी, नवनाथनगर, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

जेलरोड परिसरातील पेंढारकर कॉलनीतून गेल्या ७ जून रोजी रात्री (एमएच १५ सीवाय N १५२९) ही दुचाकी चोरीस गेली होती. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवत ही कारवाई केली, असून उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तपासात संशयितांनी उपनगर हद्दीसह, पिंपळगाव (ब.), चोपडा शहर, जळगाव शहर, जामनेर व मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर पोलीस ठाणे हद्दीतूनही दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी जावून संशयितांच्या ताब्यातून सुमारे ६ लाख ७० हजार रूपये किमतीच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यात चार अॅक्टीव्हा, चार होंडा शाईन, स्प्लेंडर व अन्य एक आदी दुचाकींचा समावेश आहे. ही कारवाई आयुक्त अंकुश शिंदे, परिमंडळ २ च्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ निरीक्षक विजय पगारे व बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक गोसावी, हवालदार विनोद लखन, सोमनाथ गुंड, पंकज कर्पे, गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे, राहूल जगताप, सुरज गवळी, सौरभ लोंढे, राहूल जाधव, संदेश रघपतवान यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.