मुलीसोबत बोलल्याच्या रागातून खून; दोघे जेरबंद

0

जळगाव ः मुलीसोबत बोलत असल्याच्या रागातून लाठ्या काठ्यांनी केलेल्या मारहाणीत सागर रमेश पालवे (वय २४, रा. मालदाभाडी ता. जामनेर) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ पिंटू बिजलाल बोदडे ( वय ४०, रा. अष्टमी कॉलनी मुक्ताईनगर व निलेश रोहिदास गुळवे (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दि. १२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे सागर पालवे हा तरुण वास्तव्यास असून तो जळगावातील ढोर मार्केट परिसरातील विदर्भ रोडलाईन्स येथे ड्रायव्हर म्हणून नोकरीस होता. दि. ७ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सागरने त्याच्या कुटुंबियांना फोन करुन सांगितले की, मला आमच्या आराम करण्याच्या रुममध्ये माझ्यासोबत काम करणारे निलेश गुळवे व पिंटू महाजन हे मारहाण करीत आहे. याबाबत त्याने मालक विकास लगडे यांना देखील सांगितले

. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सागरला त्याच्या कुटुंबीय फोन करीत होते. मात्र तो फोन उचलत नसल्याने त्याच्यासोबत असलेल्या निलेश याने फोन उचलून सागर आला होता. झोपला असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास सागरचे मालक निलेश लगडे यांनी सागरच्या कुटुंबियांना फोन करीत त्यांना जळगावला बोलावून घेतले. त्याचे कुटुंबिय जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात आल्यानंतर त्यांना सागरच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून

आल्या. मारहाणीत सागरचा मृत्यू झाला असावा असे म्हणत त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयित ज्ञानेश्वर उर्फ पिंटु बोदडे याला मुक्ताईनगरातून ताब्यात कोळी, संदीप बि-हाडे यांच्य घेतले. तर त्याचा दुसरा साथीदार निलेश गुळवे याच्या रामेश्वर कॉलनी येथील घरून त्याच्या मुसक्या आवळल्या.

 

सागर हा पिंटू बोदडे याच्या मुलीसोबत बोलत असल्याच्या कारणावरुनच पिंटू बोदडे व निलेश गुळवे यांनी सागरला मारहाण केली होती. या मारहाणीत त्याला जबर दुखापत झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची कबुली पिंटू बोदडे व निलेश गुळवे यांनी पोलिसांना दिली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता, दि. १२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ही कामगिरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ नितीन पाटील, किरण पाटील, सुधील साळवे, ईम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी व संदीप धनगर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.