शिंदे सरकारचा मविआला झटका; बड्या नेत्यांची सुरक्षा काढली

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) मोठा निर्णय घेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) झटका दिलाय. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने चर्चा होताय. कारण मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत जवळचे मानले जातात, मात्र मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्याशी त्यांची झालेली भेट ही चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याने चर्चेला अधिकच जोर आला आहे. नार्वेकरांना एक्स दर्जाची सुरक्षा होती, आता त्यांना वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

या नेत्यांची सुरक्षा काढली

छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नाना पटोले, नितीन राऊत, संजय राऊत, सतेज पाटील, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, सुनील केदार, नरहरी झिरवळे, वरूण सरदेसाई, डेलकर परिवार.

Leave A Reply

Your email address will not be published.