ज्ञानपंचमी आराधना, साधना महत्त्वाची

0

 प्रवचन सारांश – 29.10.2022 

ज्ञानावर्णिय कर्म क्षय करण्यासाठी ‘ज्ञानपंचमी’ आराधना करावी. ज्ञानाचे पाच भेद समजून घ्यावे असे आवाहन डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पु. जयपुरंदर म.सा. यांनी विशेष प्रवचनात केले.

काळानुसार आगमशास्त्र मौखिक परंपरेने आज आपल्या पर्यंत पोहोचतले. 32 आगम पहिल्यांदा लिपीबद्ध झाले. याचे श्रेय देर्वाधिक क्षमा श्रमण यांना जाते. कार्तिक पंचमी अर्थात आजच्या दिवशी १३ महिने चालत आलेले लेखन कार्य  पूर्ण झाले. त्या निमित्ताने ज्ञानपंचमी साजरी करण्यात येते.  तीर्थंकर भगवान महावीर यांनी देखील ज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. ज्ञानपंचमीच्या औचित्याने गुणमंजुरी व वर्धक यांची कथा सांगितली. वर्धक जन्माने मंदबुद्धी बालक असतो. तो राजपुत्र आणि राज्याचा उत्तराधिकारी असल्याने राजा व प्रजा दोहोंना चिंता असते. राजकुमारला बघताच तो मंदबुद्धी आहे असे निदर्शनास येत असे. काही वेळा तर त्याची टिंगल टवाळी केली जात असे.बुद्धी अनुवंशीक असतेच असे नाही. जैन दर्शन मध्ये विचित्रता असण्याचे कारणे सांगण्यात आले आहेत.

शेठ सिंहदास यांची गुणमंजुरी ही कन्या जन्मता मुक-बधीर असते. गुणमंजुरी विवाह योग्य झाली. कुणी ही तिच्याशी विवाह करण्यास तयार नव्हते. त्यावेळी त्या नगरात आचार्य विनयसेन हे ५०० शिष्यांसह राजा अजितसेन यांच्या नगरात पोहोचले. नगरातील उद्यानात त्यांचा मुक्काम होता. त्यांच्या दर्शनार्थ राजा, शेठ तसेच गुणमंजुरी व वर्धक व प्रजा पोहोचली. राजकुमार व सुंदर अशी गुणमंजुरी ह्यांच्या वाट्याला असे का यावे? याबाबत विचारले गेले. त्यावर हे तर ज्ञानावर्णीय कर्म व त्याचे फळ असल्याचे त्यांनी सांगितले. बुद्धी किंवा ज्ञान असल्याने मानव पशूपेक्षा श्रेष्ठ ठरतो. पशू व मानव यांच्या ज्ञानामुळे फरक झालेला आहे.असे पू. जयपुरंदर म. सा. यांनी सांगितले.

जयगच्छाधिपती १२ वे पट्टधर आचार्य श्री. पू. पार्श्वचंद्रजी म.सा., डॉ. पदमचंद्र म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरु आहे. त्यातील दैनंदिन प्रवचनाचा लाभ श्रावक-श्राविका घेत असतात.

पाच इंद्रियांचा माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त होते. माझा राजपुत्र मंदबुद्धी का जन्मला? असा प्रश्न राजाने विचारला असता आचार्य विनयसेन यांनी राजकुमाराच्या पूर्वजन्माची सत्य घटना सांगितली. पूर्व जन्मीचे ते आचार्य वसुदेव होते. त्यांचे भाऊ देखील त्यांच्याबरोबर दीक्षा घेतलेले होते परंतु यांच्यात जास्त हुशारी होती. त्यांनी ज्ञानाशी काही अंशी प्रतारणा केली होती. झाले असे होते की ते आजारी असताना देखील शिष्यांनी त्यांना आराम करून न देता आपल्या ज्ञानाबाबतच्या काही गोष्टी विचारल्या होत्या. दुसरी कडे त्यांचे बंधू आरामत पहुडले होते त्यांना कुणीही विचारले नाही. आपल्याला ज्ञान जास्त असल्याने आपल्याला उसंत नाही की चैन नाही अशी मनातल्या मनात त्यांनी ज्ञानाची अवहेलना केली. त्यामुळे ज्ञानावर्णीय कर्म बंध त्यांनी करून घेलते. अप्रत्यक्षपणे त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला होता. ते झाले तर ज्ञानावर्णीय कर्मबंध होतो.

गुणमंजुरी बद्दल देखील आचार्य विनयमेन यांनी सांगितले, गुणमंजुरी पूर्वजन्मी शेठाणी असते. आपल्या मुलांना गुरुकुलमध्ये शिकवायचे नाही असे त्यांनी ठरविले. इतके करून ती थांबली नाही तर ज्ञानाची साधने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिचा देखील ज्ञानावर्णीय कर्मबंध झाला. त्याचे परिणाम तिला ह्या जन्मी मुक बधीर होऊन भोगावा लागला. आपण सर्वांनी ज्ञानाची आराधना करावी. ज्ञानवर्णीय कर्मबंधापासून स्वतःला वाचवावे. काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा, मोठे, गुरुजन यांचा आदर करावा. गुरु, ज्ञान यांच्याबद्दल आदर, कृतज्ञताभाव ठेवावा. जिज्ञासा व श्रद्धा ठेवावी. आचार्य विनयसेन यांनी राजकुमार व  गुणमजुरी यांना बरे होण्याचा उपाय सांगितला. ज्ञानचंमीला ज्ञानपंचमीची आराधना करून एकासना करून वर्धक व गुणमंजुरी यांनी ज्ञानावर्णीय कर्मबंध तोडले. त्यांनी ‘ज्ञानपंचमी’ आराधना, केली ते दोघे ही बरे झाले. सर्वांनी ‘ओम ऱ्हीम णमो णाणस्स’  या मंत्राचा जप करावा  असा मंत्र ही त्यांनी प्रस्तुत प्रवाचनातून दिला.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.