Wednesday, February 1, 2023

“कोणी विकावू नाहीए..”, गुलाबराव पाटलांनी रवी राणांना सुनावलं

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. या वादावर आता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया देत रवी राणांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आमदार रवी राणांनी केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कोणी विकावू नाहीए. पण तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे.

- Advertisement -

तसेच रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचं करियर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसेच दोघांनीही शांत बसवावं, हीच प्रार्थना असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे