पिक विम्यासाठी राष्ट्रवादीचा शिंगाडा मोर्चा

0

जळगाव : केळी पिक विमाची सरसकट रक्कम मिळावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यासह जिल्ह्यातील ८० हजार शेतकरी केळी पिक विम्यासाठी पात्र ठरले मात्र शासनाने विमा कंपनीला हिस्सा न भरल्यामुळे विमा कंपनी शेतकऱ्यांना केळी पिक विम्याची सरसकट रक्कम देत नाही, म्हणून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाली. यावेळी शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनी व राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी देत सरसकट पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करण्याची मागणी केली.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील, गुलाबराव देवकर, माजी विधान सभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान बाबुराव पाटील, डॉ. बी. एस. पाटील, संजय गरूड, डॉ. बारेला, मंगला पाटील, इंदिरा पाटील, निलीमा पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, उमेश पाटील, रिंकु चौधरी, सुधिर तराळ, विजय सोनार, निवृत्तीपाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.